मणीपूरमधील विस्थापितांना पुणे परिवाराकडून साहाय्य !

मणीपूरमधील हिंसाचार

पुणे – मणीपूरमधील हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना साहाय्य म्हणून ‘वसुधैव कुटुंबकम’ या नात्याने पुणे परिवार संस्थेने साहाय्याचा हात पुढे केला आहे. यामध्ये ३५ हून अधिक गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांनी एकत्र येत साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीला टिळक रस्त्यावरील ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स’ येथे साहाय्य सामग्री देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ५ सहस्र ब्लँकेट्स आणि ५ सहस्र जेवणाच्या भांड्यांचे संच वितरित करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार (सौ.) प्रा. मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित रहाणार आहेत. मणीपूरहून हे साहित्य स्वीकारण्यासाठी मणीपूरचे नगर विकास ग्रामीण विकासमंत्री युमनाम खेमचंद सिंह, पुनर्वसन मंडळाचे प्रमुख आमदार थौना ओजम श्यामकुमार, राजेश साहनी उपस्थित रहाणार आहेत.