Sanatan Prabhat Exclusive : कुंभक्षेत्री येता आल्याने आम्ही स्वत:ला पुष्कळ भाग्यवान समजतो ! – न्यूयॉर्क आणि लंडन येथील विदेशी भाविक

न्यूयॉर्क आणि लंडन येथील विदेशी भाविक

प्रयागराज, १४ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभपर्व काळात कुंभक्षेत्री येता आल्याने आम्ही स्वत:ला पुष्कळ भाग्यवान समजतो. आम्ही या क्षणाचे भागीदार होण्यासाठी येथे आलो आहोत. मनुष्याला रहाण्यासाठी जग चांगले होण्यासाठी येथे प्रयत्न होत आहेत. या ठिकाणी प्रेम आहे, भक्ती आहे, असे उद्गार कुंभपर्वात स्नान केल्यानंतर न्यूयॉर्क (अमेरिका) आणि लंडन (इंग्लड) येथील भाविकांनी काढले. पर्वस्नानानंतर ‘सनातन प्रभात’शी बोलतांना त्यांनी हे उद्गार काढले.

न्यूयॉर्कची एक महिला म्हणाली की, माझ्या मनाला असामान्य अशी अनुभूती येथे येत आहे.. गंगा नदीविषयी मी कृतज्ञता व्यक्त करते. या महाकुंभातून मानवी संस्कृती आणि सभ्यता यांच्या या अद्वितीय एकत्रीकरणाविषयी मी धन्यवाद देते.

न्यूयॉर्क येथील ‘फॅशन डिझायनर’ असलेल्या अन्य एका भाविकाने सांगितले की, मी येथे रंगांची उधळण पहाण्याच्या दृष्टीने आलो होतो; मात्र येथे केवळ रंग नसून लोकांमधील एकता, श्रद्धा आणि प्रेम यांचे हे एकत्रीकरण आहे. यामुळे मला पुष्कळ आशा निर्माण झाली असून प्रेरणाही मिळाली आहे.

संपादकीय भूमिका

एकीकडे हिंदु धर्म आणि संस्कृती यांच्याप्रती विदेशी लोकांमध्ये कृतज्ञताभाव असतो. दुसरीकडे भारतातील अनेक नतद्रष्ट धर्मद्रोही जन्महिंदू हिंदु धर्मावरच चिखलफेक करतात. हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद !