सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकरआजी यांचा देहत्याग !

रत्नागिरी येथील सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकर (वय ८७ वर्षे) यांनी १० फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी फोंडा (गोवा) येथे मुलाच्या घरी देहत्याग केला. त्या दीर्घकाल रुग्णाईत होत्या.

शासनाकडून महाराष्ट्रात उभारण्यात येणारी ‘चक्रीवादळ निवारा केंद्रे’ कागदावरच !

कामाची समयमर्यादा संपूनही निविदा प्रकियेतच काम रखडले ! चक्रीवादळामध्ये होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी या संवेदनशील प्रश्‍नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशातही विक्री, आणखी एका आरोपीला अटक

‘पॉर्न प्रॉडक्शन आस्थापना’ने बनवलेल्या ‘पॉर्न व्हिडिओ’ची परदेशात विक्री करणार्‍या उमेश कामत याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या अटकेमुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या ७ झाली आहे.

कामाच्या वेळी केस विंचरायला जाणे, हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार !

‘रंगाराव यांनी काम चालू करण्याऐवजी वरिष्ठांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली, हेसुद्धा गैरवर्तनच आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने रंगाराव यांची याचिका फेटाळली.

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा निर्णय लवकरच घेण्यात येईल ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

राज्यातील पदवी महाविद्यालये चालू झाली, तरी विद्यार्थ्यांना अद्यापही उपनगरी गाड्यांतून प्रवास करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही.

सांगली जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.

भारतरत्नांची चौकशी करणार्‍या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?  – फडणवीस

शेतकर्‍यांच्या आंदोलनावर विदेशातील वलयांकित व्यक्तींनी ट्वीट केल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय वलयांकित व्यक्तींनी केलेल्या ट्वीटची चौकशी करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषित केले आहे.

मुंबई विमानतळाच्या २३.५ टक्के भागाची अदानी यांच्याकडून खरेदी

‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड’ या आस्थापनाने परदेशातील आस्थापन ‘एसीएस्ए ग्लोबल लिमिटेड’ आणि ‘बिड सर्व्हिसेस डिव्हिजन (मॉरिशस) लिमिटेड’ यांच्याकडून हे भाग १६८५ कोटी २५ लाख रुपये इतके मूल्य देऊन खरेदी केले आहेत.

संगम माहुली येथे उसाच्या शेताला लागलेल्या आगीत ८ एकरातील ऊस जळला

या आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्‍यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्‍याला आग लावण्यात आली होती.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे भाजपच्या नेत्याला काळे फासणार्‍या २५ शिवसैनिकांवर गुन्हा नोंद

वीजदेयक वसुलीविरुद्ध आंदोलनात भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते.