लक्षावधी रुपयांची हानी

सातारा, १० फेब्रुवारी (वार्ता.) – शहराजवळील संगम माहुली या गावातील उसाच्या शेताला आग लागली. आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्याला आग लावण्यात आली होती. या आगीचे लोळ उसापर्यंत गेले आणि त्यालाही आग लागली. ही गोष्ट लक्षात येताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली.
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
परळी (बीड) येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन !
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !