
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – शिवसेनाप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप नेते शिरीष कटेकर यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासले, तसेच त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पंढरपूर येथील शिवसेनेच्या शहराध्यक्षांसह २५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यातील १७ जणांना अटक करण्यात आली आहे. याविषयी शिरीष कटेकर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली होती.
४ फेब्रुवारी या दिवशी भाजपच्या वतीने राज्यात वीजदेयक वसुलीविरुद्ध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी ६ फेब्रुवारी या दिवशी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !