रामनाथी (गोवा) – रत्नागिरी येथील सनातनच्या ९९ व्या संत पू. (श्रीमती) विजया लोटलीकर (वय ८७ वर्षे) यांनी १० फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी फोंडा (गोवा) येथे मुलाच्या घरी देहत्याग केला. त्या दीर्घकाल रुग्णाईत होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, ३ मुलगे, ३ सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. ११ फेब्रुवारी या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘आदर्श पत्नी’, ‘आदर्श माता’ आणि ‘आदर्श आजी’ अशा भूमिका बजावतांना पू. आजींनी त्यांच्या कुटुंबावर चांगले संस्कार केले. त्यामुळेच आज लोटलीकर कुटुंब साधनारत आहे. आजींची मुले, सुना आणि नातवंडे साधना करत असून त्यांची पतवंडे उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आली आहेत. पू. आजींना स्मृतीभ्रंश झाल्याने त्या कुणाला ओळखत नसत; मात्र केवळ परात्पर गुरु डॉक्टरांना त्या ओळखत. पू. आजी अखंड नामानुसंधानात असत. पू. आजींच्या साधनेमुळे त्यांच्या देहातही दैवी पालट झाले होते. त्यांची त्वचा पारदर्शक झाली होती, तसेच पायावरील आणि हातावरील त्वचेला चकाकी आली होती.
पू. श्रीमती विजया लोटलीकर यांना सनातनच्या रामनाथी आश्रमातील महाप्रसाद दिल्यावर त्यातील चैतन्यामुळे त्यांना अन्नपाणी ग्रहण करता येणे‘पू. श्रीमती विजया लोटलीकर आजी यांना डोंबिवलीहून गोव्यात आणल्यावर त्यांचे अन्न पाणी ग्रहण करणे बंद झाले होते. कु. प्रियांकानी (पू. आजींची नात कु. प्रियांका लोटलीकर यांनी) याविषयी संतांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आश्रमातील प्रसाद आणि तीर्थ त्यांना द्या.’’ त्या वेळी पू. लोटलीकर आजींना पातळ पेज आणि सूप दिल्यानंतर त्या ते ग्रहण करू लागल्या आणि त्यांना शौचालासुद्धा होऊ लागले. तेव्हा आश्रमातील महाप्रसादाचे महत्त्व लक्षात आले अन् कृतज्ञता वाटली. त्या वेळी गुरुदेवांना प्रार्थना झाली.’ – सौ. संगीता विजय लोटलीकर, रायगड (२५.१२.२०२०) |