श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर !

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या खजिन्यात आता आणखी ६४ लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची भर पडली आहे. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० पर्यंत देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

राज ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी यांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस

अ‍ॅमेझॉन’च्या ‘अ‍ॅप’मध्ये मराठी भाषेचा उपयोग करावा, याविषयी मनसेने दिलेल्या चेतावणीवरून ‘अ‍ॅमेझॉन’ने न्यायालयात धाव घेतली

नागरिकांना संकटाची जाणीव करून देणे आवश्यक असल्यामुळे रात्रीची संचारबंदी ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू केल्यामुळे काही जणांकडून टीका केली जात आहे; मात्र जनतेला बंधन आणि संकट यांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्यामुळेच रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर सहस्रो मासे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बांधून ठेवले

इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

नगर अर्बन बँकेमध्ये ३ कोटी रुपयांचाअपहार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये ३ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी भाजप वरिष्ठ नेते आणि माजी खासदार दिलीप मनसुखलाल गांधी, घनश्याम बल्लाळ, आशुतोष लांडगे यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या सदस्यांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या कुलगुरूंवर भ्रष्टाचाराचे आरोप

कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापिठातील कामात घोटाळा केल्याचा आणि चारचाकी वाहनांच्या ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी सहस्रो रुपये मोजले असल्याचा आरोप सिनेट सदस्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

पोलीस कर्मचार्‍यांच्याच मुली सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ?

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने जनतेला साधना शिकवून सात्त्विक न केल्याने भारतात प्रतिदिन अनेक तर्‍हेचे सहस्रो गुन्हे होत आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले