ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस ‘आविष्कार ठाणे सन्मान-२०२४’ पुरस्काराने सन्मानित !

श्री. प्रदीप चिटणीस (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना कॅप्टन दळवी 

ठाणे – येथील शास्त्रीय गायक आणि संगीत उपचारक (संगीतीच्या माध्यमातून उपचार करणे) श्री. प्रदीप चिटणीस यांना ‘आविष्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन, ठाणे’ या संस्थेच्या वतीने ‘आविष्कार ठाणे सन्मान-२०२४’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार कॅप्टन दळवी यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी श्री. चिटणीस यांना पुरस्कारासमवेत सन्मानपत्रही देण्यात आले.

१. या संस्थेच्या वतीने स्वतःच्या कर्तृत्वाने ठाणे शहराचे नाव उंचावणार्‍या आणि शून्यातून विश्‍व निर्माण करणार्‍या ठाण्यातील एका मान्यवर व्यक्तीला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षीचा हा सन्मान श्री. चिटणीस यांना देण्यात आला.

२. वर्ष १९८८ मध्ये श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘विमल संगीत साधना’ या नावाने चालू केलेल्या विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना गायन आणि वादन यांचे शिक्षण देण्यास प्रारंभ केला. या संस्थेच्या माध्यमातून श्री. चिटणीस यांनी आजवर ३ सहस्र विद्यार्थ्यांना घडवले आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील या कार्याची नोंद घेत ‘आविष्कार ग्रुप ऑफ एज्युकेशन’ या संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिला आहे.

४. ही संस्था मागील २४ वर्षांपासून शिकवणी वर्गांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेतील काही विद्यार्थी आणि शिक्षक त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काही रक्कम बचत करतात आणि त्या पैशांतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

५. श्री. प्रदीप चिटणीस गेल्या ६ वर्षांपासून नियमितपणे महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने करण्यात येणार्‍या विविध संगीत संशोधन कार्यात सहभागी होत आहेत.