सातारा येथील श्री मांढरदेवीच्या यात्रेत पशूबळी आणि वाद्य वाजवण्यास बंदी !

सातारा – येथील वाई तालुक्यातील मांढरदेवीची यात्रा १२ ते २० जानेवारी या कालावधीत होणार आहे. या कालावधीत पशूबळी आणि वाद्य वाजवण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे. जिल्हा दंडाधिकार्‍यांनी ‘मुंबई पोलीस अधिनियम, १९५१’चे कलम ३६ लागू केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने दिलेल्या आदेशाचे पालन करत यात्रेत पशूबळी देण्यास अनुमती दिली जाणार नाही. (ईदच्या काळात गोहत्या केली जाते. याची नोंद घेऊन त्यावर न्यायालयाने बंदी घालावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक) ‘वाद्याच्या गोंगाटामुळे सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण होऊ शकतात’, या कारणास्तव वाद्य वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे. यात्रेच्या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही पोलीस आणि प्रशासन ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंगे काढत नाहीत. यावरून न्यायालयांच्या आदेशाचे सोयीस्करपणे पालन केले जाते, हे लक्षात घ्या !