पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार

पुणे – येथील एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलीचे २१ डिसेंबरच्या रात्री ८ वाजता तिघांनी अपहरण करून तिच्यावर नेवासा (जिल्हा नगर) परिसरात अत्याचार केले. तिची परिसरातील सागर मोहन सातव (वय २८ वर्षे) या तरुणाशी मैत्री होती. सागरने २ साथीदारांच्या साहाय्याने हे कृत्य केले. अत्याचार करून तिला पुन्हा पुणे येथे आणून सोडले. या प्रकरणी मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सागर सातव याच्यासह त्याच्या दोन्ही साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. (पोलीस कर्मचार्‍यांच्याच मुली सुरक्षित नसतील, तेथे सर्वसामान्यांच्या मुलींच्या सुरक्षेची काय स्थिती असेल ? – संपादक)