Rape In Britain : ब्रिटनमधील मुसलमानांकडून केल्या जाणार्‍या वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून ब्रिटनमध्ये संताप !

  • ब्रिटीश खासदार, उद्योगपती इलॉन मस्क, लेखक जे.के. रोलिंग यांची टीका

  • ब्रिटनच्या पंतप्रधानांना धरले उत्तरदायी

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये मुसलमानांच्या ‘ग्रूमिंग’ टोळीच्या वाढत्या घटनांवरून वाद चालू झाला आहे. ‘ग्रूमिंग’ म्हणजे लहान मुली किंवा तरुणी यांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणे होय. गेल्या २४ घंट्यांत सामाजिक माध्यम ‘एक्स’वर ब्रिटीश खासदार, अमेरिकी उद्योगपती इलॉन मस्क आणि ब्रिटीश लेखिका जे.के. रोलिंग यांसारख्या लोकांनी या विषयावर मते मांडली. मस्क यांनी अशा गुन्ह्यांच्या हाताळणीवरून ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्यावर टीका केली आहे.

ग्रूमिंग टोळी म्हणजे काय?

‘ग्रूमिंग’ टोळीमधील मुसलमान तरुण मुलींना लक्ष्य करतात. ते त्यांना भेटवस्तू देतात आणि त्यांना असे भासवले जाते की, तो त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्याचबरोबर जेव्हा मुली त्यांच्यावर विश्‍वास ठेवू लागतात, तेव्हा ते त्यांचे शोषण करतात. ग्रूमिंग टोळीतील तरुण या मुलींना मेजवान्यांना घेऊन जातात, त्यांना अमली पदार्थ देतात आणि नंतर एक किंवा अधिक तरुणांसमवेत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडतात. यातील अनेक मुली गरोदरही झाल्या आणि त्यांना गर्भपात करावा लागला. तथापि काहींनी मुलाला जन्म दिला; परंतु त्यांना त्याच्या वडिलांचे नाव ठाऊक नव्हते. ग्रूमिंग टोळ्यांनी रॉचडेल, रॉदरहॅम आणि टेलफोर्ड या भागांतील सर्वाधिक मुलींना फसवले.

१. इलॉन मस्क म्हणाले की, ब्रिटनमध्ये बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये, संशयितांवर आरोप ठेवण्यासाठी पोलिसांना ‘क्राउन प्रोसिक्युशन सर्व्हिस’ची (‘सी.पी.एस्.’ची) अनुमती घेणे आवश्यक असते. बलात्कार करणार्‍यांची टोळी अशी घृणास्पद कृत्ये करत असतांना सी.पी.एस्.चा प्रमुख कोण होता ? वर्ष २००८ ते २०१३ पर्यंत केयर स्टार्मर प्रमुख होते.

२. मस्क यांनी दुसर्‍या पोस्टमध्ये ‘टॉमी रॉबिन्सन याला मुक्त केले पाहिजे’ असे म्हटले आहे. रॉबिन्सन एक ब्रिटीश पत्रकार आहे, ज्याने ग्रूमिंग टोळी आणि मुलींचे लैंगिक शोषण यांविषयी एक माहितीपट बनवल्याने त्याला अटक करून कारागृयात टाकण्यात आले आहे.

३. लेखिका जे.के. रोलिंग यांनीही या गुन्ह्यांचा निषेध केला आणि पोलिसांच्या संभाव्य भ्रष्ट कारभारावर प्रश्‍न उपस्थित केले.

४. ब्रिटनचे माजी पंतप्रधान लिझ ट्रस या यांनी या टोळीविषयी म्हटले की, ११ वर्षांच्या लहान मुलींसमवेतच्या या घृणास्पद प्रकरणांनी आपल्या देशाला लाज आणली आहे. केवळ गुन्हेगारांनाच नव्हे, तर वाढत्या वांशिक तणावाकडे डोळेझाक करणार्‍या अधिकार्‍यांनाही शिक्षा झाली पाहिजे.

५. ब्रिटनचे खासदार रुपर्ट लो म्हणाले की, ११ वर्षांच्या मुलीच्या संदर्भातील बातमी वाचल्यानंतर मला खूप राग आला की, आपल्या देशाने असे होऊ कसे दिले जाते? ही ‘ग्रूमिंग’ टोळी नाही, तर बलात्कारी टोळी आहे. ब्रिटिश असल्याची मला खरोखरच लाज वाटते.

संपादकीय भूमिका

भारतात लव्ह जिहाद करणारे धर्मांध मुसलमान ब्रिटनमध्ये ख्रिस्ती मुलींचे लैंगिक शोषण करतात. यावरून त्यांची धर्मांधता आणि वासनांधता दिसून येते. ब्रिटनसारख्या सुधारणावादी आणि स्त्रींच्या अधिकारांविषयी सजग असणार्‍या देशामध्ये वासनांध मुसलमानांकडून मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि सरकार हतबल राहून काहीही करत नाही, हे आश्‍चर्यजनक आहे !