तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यासाठी पोलिसांनाच धैर्यवान करण्याची आवश्यकता आहे !

पोलीस हवालदार सखाराम भोये

मुंबई – पालघर जिल्ह्यातील तुलिंज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी २४ डिसेंबर या दिवशी सकाळी ६.३० वाजता स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेनंतर भोये यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. भोये यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील अन्वेषण चालू आहे.