Bangladesh Chinmoy Das Bail Plea Rejected : बांगलादेशामध्ये ‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय प्रभु यांचा जामीनअर्ज फेटाळला !

‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय प्रभु

ढाका – ‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय प्रभु बांगलादेशातील कारागृहात एक महिन्याहून अधिक काळ बंद आहेत. नुकतेच चितगाव महानगर सत्र न्यायाधिशांच्या न्यायालयात त्याच्या जामिनावर ३० मिनिटे सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर चिन्मय प्रभु यांचा जामीनअर्ज फेटाळला. याआधी ११ डिसेंबर या दिवशी न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळली होती. चिन्मय प्रभु यांच्यावर चिथावणीखोर वक्तव्ये करणे, हिंसाचाराला प्रोत्साहन देणे आदी गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

कोलकाता ‘इस्कॉन’चे उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, नवीन वर्षात चिन्मय प्रभु यांना स्वातंत्र्य मिळेल, अशी आशा सर्वांना होती; मात्र ४२ दिवसांनंतरही त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. बांगलादेश सरकारने चिन्मय प्रभु यांना न्याय मिळेल याची खात्री करावी. या सुनावणीनंतर चिन्मय प्रभु यांचे अधिवक्ता अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी सांगितले की, ते आता जामिनासाठी उच्च न्यायालयात जाणार आहेत.