उत्तरप्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

उत्तरप्रदेशमधील नोएडा येथे १ सहस्र हेक्टरहून अधिक भूमीवर ही आंतरराष्ट्रीय स्तराची चित्रपटसृष्टी निर्माण करणार, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.

गायत्री मंत्राचे विडंबन करणारे गुजराती अभिनेते रंधेरियासह ५ जणांच्या विरोधात नंदुरबार येथे तक्रार प्रविष्ट

गायत्री मंत्राचा मद्य प्राशनाशी संबंध दर्शवणारे चित्रण प्रदर्शित करून धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी हिंदु सेवा समितीचे श्री. नरेंद्र पाटील यांनी नंदुरबार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. यामुळे गज्जूभाईचे पात्र गाजवणारे गुजरातचे विनोदवीर सिद्धार्थ रंधेरियासह अन्य ५ जणांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी ही तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

योगी आदित्यनाथ निवासाला असलेल्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणाबाजी

आंदोलकांनी काळे झेंडे फडकवून योगी आदित्यनाथ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

अमली पदार्थांची विक्री करणार्‍या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.

मुसलमान तरुणाचे हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी धर्मांतर

मुसलमान तरुणाने केलेले धर्मांतर किती दिवस टिकणार ? कि तो नंतर हिंदु तरुणीचेच धर्मांतर करणार ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.

पाकच्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी हुतात्मा

सीमा सुरक्षा दलातील एक उपनिरीक्षक पाओतिंसत गुइते हुतात्मा , पाकला नष्ट केल्याविना या घटना थांबणार नाहीत !

स्वतःसाठी जोडीदाराची निवड करणे हा कोणत्याही सज्ञान व्यक्तीचा मूलभूत अधिकार ! – कर्नाटक उच्च न्यायालय

याचिकाकर्ते सॉफ्टवेअर इंजिनीयर वजीद खान यांनी सॉफ्टवेअर इंजिनीयर राम्याशी विवाह केला. महिला संरक्षण समितीच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या राम्याला न्यायालयासमोर उपस्थित करून तिची सुटका करण्याची मागणी वजीदने केली होती.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घाला ! – सुफी इस्लामिक बोर्डाची पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी संघटनांकडून आतापर्यंत या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी होत असतांना आता मुसलमानांच्या धार्मिक संघटनेकडून अशी मागणी होत आहे, हे केंद्र सरकारने लक्षात घेऊन लवकरात लवकर पीएफआय’वर बंदी घालावी !

जे.एन्.यू.ची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग ! – शेहला रशीदच्या वडिलांचा आरोप

पोलिसांनी सखोल अन्वेषण करावे; कारण जेएनयूमधील साम्यवादी विचारांच्या विद्यार्थ्यांना आणि नेत्यांपैकी काही जणांना अशाच प्रकरणांत अटक करण्यात आलेली आहे. स्वतः वडीलच मुलीविषयी असा आरोप करत असतील, तर तो अधिकच गंभीर !