योगी आदित्यनाथ निवासाला असलेल्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणाबाजी

मुंबई – उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवासाला असलेल्या ‘ट्रायडेंट’ या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. उत्तर प्रदेश येथील हाथरस येथील बलात्काराच्या प्रकरणाच्या अनुषंगाने ‘तेथे महिला असुरक्षित आहेत’, या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काळे झेंडे फडकवून योगी आदित्यनाथ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी आमदार विद्या चव्हाण उपस्थित होत्या. पोलिसांनी आंदोलकांना कह्यात घेतले आहे.