कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका  

वार्थुर प्रकाश

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्याचे माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे २७ नोव्हेंबर या दिवशी ८ जणांनी अपहरण केले होते; मात्र दुसर्‍या दिवशी त्यांची सुटका करण्यात आली. याविषयी पत्रकारांनी विचारले असता प्रकाश यांनी ‘नंतर याची माहिती देईन’, असे सांगितले. दुसरीकडे त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.