मुसलमान तरुणाचे हिंदु मुलीशी विवाह करण्यासाठी धर्मांतर

तरुणीच्या कुटुंबियांपासून धोका असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी दिले संरक्षण !

मुसलमान तरुणाने केलेले धर्मांतर किती दिवस टिकणार ? कि तो नंतर हिंदु तरुणीचेच धर्मांतर करणार ? असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

यमुनानगर (हरियाणा) – येथे एका मुसलमान तरुणाने हिंदु तरुणी समवेत विवाह करण्यासाठी धर्मांतर केल्यानंतर या दोघांना पोलिसांनी संरक्षण दिले आहे. दोघांना पोलिसांनी सुरक्षागृहात ठेवले आहे. दोघांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात संरक्षणासाठी याचिका केली होती. पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस अधीक्षक कमलदीप यांनी सांगितले की, २१ वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणीने ९ नोव्हेंबरला हिंदु पद्धतीने विवाह केला होता. या तरुणाने विवाहानंतर स्वतःचे नावही पालटले होते. दोघांनी नंतर उच्च न्यायालयात याचिका करून ‘मुलीच्या कुटुंबियांपासून जिवाला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला धोका आहे’, असे तरुणाने सांगितले.