मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या धर्मांध महिलेला अटक

अमली पदार्थांच्या विक्रीत आता धर्मांध महिलाही आघाडीवर !

मुंबई – शहरातील कुर्ला-एल्.बी.एस्. (लालबहाद्दूरशास्त्री मार्ग) येथे अमली पदार्थांची विक्री करणार्‍या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली. तिच्याकडे ५०३ ग्रॅम इतका अमली पदार्थांचा साठा सापडला. त्याचे मूल्य ५० लाख ३० सहस्र रुपये आहे. हे अमली पदार्थ या महिलेने कुठून आणले, याचा शोध पोलीस घेत आहेत.