उत्तराखंडमधील भाजप शासन आंतरधर्मीय विवाह करणार्‍यांना ५० सहस्र रुपये देण्याचा निर्णय रहित करणार

उत्तराखंडमधील भाजप शासन अन्य धर्मामध्ये विवाह करणार्‍या दांपत्याला ५० सहस्र रुपये प्रोत्साहन स्वरूपात देण्याची योजना रहित करणार आहे. हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर टीका केल्यामुळे आता ही योजना केवळ आंतरजातीय जोडप्यांनाच लागू होईल.

उत्तरप्रदेशमध्ये पत्रकार आणि त्याचा मित्र यांची घरात सॅनिटायझरद्वारे जाळून हत्या

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर आहे, हे प्रतिदिन वेगवेगळ्या घटनांमधून उघड होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकारनेही राज्य सरकारला साहाय्य करावे, असेच जनतेला वाटते !

भाविकांनी साईबाबांचे दर्शन भारतीय वेशभूषेतच घ्यावे ! – साई संस्थान, शिर्डी

साई संस्थानचा स्तुत्य निर्णय ! अन्य मंदिरांनीही या निर्णयाचे अनुकरण करावे, ही अपेक्षा !

पुदुचेरी येथे धर्मांधाने मंदिरात घुसून शिवीगाळ करत केले ‘फेसबूक’वरून थेट प्रक्षेपण

हिंदूंच्या मंदिरांचे रक्षण करणे किती महत्त्वाचे झाले आहे, हे लक्षात येते ! आतापर्यंत रात्री गुपचूप मंदिरांमध्ये घुसून मूर्तींची तोडफोड होत होती, आता थेट मंदिरात घुसून शिवीगाळ केली जात आहे, उद्या तोडफोड करण्याचे धाडस झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !

छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंगाच्या स्फोटात २ जण घायाळ

नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक जीप उडवून लावल्याने २ नागरिक घायाळ झाले. बासागुडा आणि तर्रेम गावाच्या मध्य राजपेंटा गावाजवळ ही घटना घडली. पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठी हा भूसुरूंग पेरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान धर्माकडे दुर्लक्ष करणारे हिंदु आतातरी जागे होतील का ?

वाराणसी येथे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत देवदिवाळी साजरी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आल्यानंतर येथील ८४ घाटांवर १५ लाखांहून अधिक दीप प्रज्वलित करण्यात आले.

भारतीय संस्कृती जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील ! – इंद्रेश कुमार, अध्यक्ष, मुस्लिम राष्ट्रीय मंच

भारतीय संस्कृती देशाला विश्‍व गुरू बनवून जगाला विश्‍वशांतीचा मार्ग दाखवील= मुस्लिम राष्ट्र्रीय मंचाचे अध्यक्ष इंद्रेश कुमार.

‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे शरिरावर गंभीर परिणाम झाल्याने वितरण थांबवण्याची चेन्नईच्या स्वयंसेवकाची मागणी

एका ४० वर्षीय स्वयंसेवकाने कोव्हिशिल्ड लसीच्या चाचण्या, उत्पादन आणि वितरण तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

मुसलमान तरुणीवर प्रेम करून तिला पळवून नेल्यावरून तरुणीच्या कुटुंबियांकडून हिंदु तरुणाच्या भावाची हत्या

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करणार्‍यांच्या विरोधात हिंदू कायदेशीर कारवाई करत बसतात, तर मुसलमान तरुणीवर खर्‍या अर्थाने प्रेम करणार्‍या हिंदु तरुणांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना धर्मांध ठार करतात, हे लक्षात घ्या !