जैन समाजाचे यश !

हिंदूंनो, जैनांकडून शिका ! मंदिरे, तीर्थक्षेत्रे, तसेच गडदुर्ग येथे होणारे अपप्रकार, तेथील अतिक्रमणे हे सर्व दूर करण्‍यासाठी धर्माविषयी जागरूक असणारे काही हिंदू कृतीशील होत आहेत; पण धर्मरक्षणासाठी तुटपुंजे नव्‍हे, तर हिंदूंचे भव्‍य संघटन अपेक्षित आहे. हे भव्‍य संघटनच हिंदु राष्‍ट्राची वाट सुकर करेल, हे निश्‍चित !

हल्‍द्वानीमधील अतिक्रमण हटणार ?

वर्ष २०१४ पूर्वी राज्‍यात काँग्रेसची सत्ता होती आणि या भागात नेहमीच काँग्रेसचे आमदार निवडून येत होते. अल्‍पसंख्‍यांकांची मते ही नेहमीच मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला मिळतात. त्‍यामुळे अशा अल्‍पसंख्‍यांकांच्‍या अवैध बांधकामांकडे दुर्लक्ष केल्‍यास नवल ते काय ?

राष्ट्रवादी कि ‘ब्रिगेडी’ ?

धर्मवीर संभाजी महाराज यांना ‘धर्मवीर’ न म्हणता केवळ ‘स्वराज्यरक्षक’ असे संबोधण्यास सांगून रयतेत भेद निर्माण करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसने समाजात स्वतःची प्रतिमा मात्र ‘स्वराज्यभक्षक’ अशी करवून घेतली आहे, हे मात्र निश्चित !

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

निराधार काश्मिरी हिंदू !

३३ वर्षांत सहस्रो काश्मिरी मुसलमान तरुण आधीचे आतंकवादी तरुण ठार होत असतांनाही आतंकवादी संघटनांमध्ये भरती होत राहिले आणि होत आहेत, ही वस्तूस्थिती आहे. जोपर्यंत जिहादी मानसिकता आणि जिहादी देश पाकिस्तान यांना नष्ट केले जात नाही, तोपर्यंत काश्मीरमधील हिंदूंचा वंशसंहार होतच रहाणार, हे स्वीकारावेच लागेल !

पोलीसदलात ‘सीमा’ हव्यात !

बेपत्ता मुलांची समस्या ! केवळ पोलिसांवर दायित्व ढकलून चालणार नाही. त्यासाठी ‘गरिबी निर्मूलन करणे’, ‘मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे’, ‘मुलांवर लैंगिक अत्याचार करणार्‍यांवर आळा घालणे’, यांसाठी शासन आणि समाजाकडूनही  प्रयत्न व्हायला हवेत. सीमा ढाका यांच्या कामगिरीची नोंद घेतांना या सर्व सूत्रांचा सर्वांगाने अभ्यास होणे आवश्यक !

पंतप्रधानांचा मातृसेवेचा आदर्श !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे गुजरात येथे २ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आणि अंत्यविधी यांच्या वेळी नरेंद्र मोदी अन् मोदी कुटुंबीय यांचा साधेपणा जगाने अनुभवला.

‘बे’शिस्तीचे शतक पार !

स्वतः बेशिस्त असतांना इतरांना शिस्त लावण्याच्या फुकाच्या गोष्टी करणारे देशहित काय साधणार ?

भारतद्वेषी ‘डब्लू.एच्.ओ.’ !

प्रत्येक ठिकाणी नाक खुपसणारी ‘डब्लू.एच्.ओ.’ ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प ! जागतिक आरोग्य संघटना या नात्याने या प्रकरणात तिचे दायित्व काहीच नाही का ? बड्या राष्ट्रांतील औषधनिर्माण करणार्‍या श्रीमंत आस्थापनांच्या विरोधात न बोलण्याच्या संदर्भात त्यांचे काही साटेलोटे तर नाही ना ?

‘तुळजापूर फाइल्स’ !

आपल्या देशात सरकारी पातळीवर भ्रष्टाचार इतका खोलवर रुजला आहे की, तो सार्वजनिक जीवनाचा जणू अविभाज्य भाग बनला आहे. भ्रष्टाचार करण्याजोगी सर्व क्षेत्रे संपल्यानंतर राजकारण्यांनी त्यांचा मोर्चा हिंदूंची तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे यांच्याकडे वळवला आहे.