गुजरातमध्ये हिंदुत्वाची सुनामी !

गुजरातच्या निवडणुकीमुळे प्रखर राष्ट्रवादाची भूमिका घेत हिंदुत्वाच्या सूत्रावर तितकेच आग्रही रहाणे, विकासाच्या सूत्रावर तडजोड न करणे, निवडणुकीत लोकांना दिलेली आश्वासने पाळणे या गोष्टींवर जर भर दिला, तर नागरिक भरभरून मते देतात, हेच परत एकदा या निमित्ताने सिद्ध झाले आहे.

लोकऐक्य महत्त्वाचे !

महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात एक प्रदीर्घ सीमावाद आहे. या ‘सीमावादा’वर निर्णय होईल तेव्हा होईलच; पण राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मात्र एकत्र येऊन या ‘वादाची सीमा’ आता निश्चित केली पाहिजे ! यातच राष्ट्राचे भले आहे !!

मोगलप्रेमी विचारवंत !

मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !, असे वक्तव्य कर्नाटकातील निवृत्त जिल्हा न्यायाधीश वसंता मुळसावळगी यांनी केले. ‘मोगलांनी भारतात हिंदूंचे काय केले ?’, हा इतिहास आहे. तो दडपला गेला.

वैचारिक आतंकवादी !

हिंदू ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत आणि या काळात २-३ अवैध बायका ठेवतात, असे संतापजनक विधान ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांनी नुकतेच केले. त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागल्यावर त्यांनी क्षमायाचना केली.

सरकारकडून भारताचे इस्लामीकरण ?

सरकारी निधीतून चालू असलेले भारताचे इस्लामीकरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्यांक आयोग आणि त्याचे मंत्रालय त्वरित बंद करावेत !

उंदराचा जीव !

एका अर्थी मुक्या प्राण्यांचा विचार केला जाऊ लागला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे; मात्र असा विचार केवळ सोयीनुसार कुणी करत असेल, तर तो दांभिकपणाच म्हणायला हवा.

प्रशासकीय जिहाद !

देशात सध्या ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘हलाल जिहाद’ आदी जिहादी कारवाया चालू असतांना आता ‘प्रशासकीय जिहाद’ नवीन चालू झाला किंवा त्या दृष्टीने कुणाचे प्रयत्न चालू आहेत, असे जर कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटायला नको.

तंत्रज्ञान…जरा आवरा !

जगप्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्ट्रेडेमस याने वर्तवलेल्या एका भविष्यात ‘कृत्रिम बुद्धीमत्ता असणार्‍या रोबोची निर्मिती होईल आणि ते रोबो मानवजातीचा विनाश करतील’, असे म्हटले आहे. यातून शिकण्याचे तात्पर्य असे की, तंत्रज्ञानाला वेसण घातले नाही, तर ते अनियंत्रित होऊन मानवाचाच घात करू शकते, हे येथे लक्षात घ्यायला हवे.

विश्वविघातक प्रदूषण रोखा !

प्रदूषणाच्या वाढत्या भस्मासुराचा सामना करण्याचे मोठे शस्त्र हिंदु धर्मातील ऋषिमुनींनी ‘अग्निहोत्रा’च्या माध्यमातून आपल्याला आधीच उपलब्ध करून दिले आहे. अग्निहोत्रातून उत्पन्न झालेल्या धुराने वायूचे शुद्धीकरण होऊन हानीकारक विषाणूंचा नाश होतो. त्याचा अवलंब वैश्विक स्तरावर होण्याच्या दृष्टीने भारत सरकारने प्रयत्न करावेत.

बॉलीवूड आणि हवाला !

अनेक अभिनेते हे अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान, तसेच अन्य व्यसनांच्या अधीन आहेत. काही जण तर राष्ट्रविघातक कारवायांना पाठिंबा देतात. अशांनी पांघरलेला मानवतावाद, सुधारणावाद यांचा बुरखा फाडणे, ही काळाची आवश्यकता आहे, हे अशांना आदर्श मानणार्‍या तरुणांनी लक्षात घ्यायला हवे.