पत्रकारावरील आक्रमण !

या घटनेवरून आणखी एक गोष्‍ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्‍हणजे समाजाची विरोध पचवण्‍याची शक्‍ती न्‍यूनतम झाली आहे. एखादे सूत्र चिघळत ठेवणे, तसेच एखाद्या सूत्रावरून भावना भडकावत रहाणे, याचा परिणाम कुठल्‍या थराला जाऊ शकतो ? हेही यावरून लक्षात येते.

अध्‍यात्‍माची महानता !

‘जेईई मेन’ परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्‍याने अध्‍यात्‍माचे महत्त्व सांगणे, ही विज्ञानवाद्यांसाठी मोठी चपराकच !

‘तुर्कीये’चा धडा !

भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती यावर मानव कायम वैज्ञानिक दृष्‍टीनेच उपाययोजनांचा विचार करतो. त्‍यासाठी आपल्‍या ऋषिमुनी-साधू-संत यांनी दाखवलेला शाश्‍वत मार्गच यावरील उपाययोजना आहे. तुर्कीये येथील भूकंपातून धडा घेऊन नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्‍यासाठी भारताने गतीने सिद्धता करणे आवश्‍यक !

तुष्‍टीकरणाच्‍या राजकारणाचा प्रवेश

मुसलमान तुष्‍टीकरणाचे राजकारण करणारे भारत राष्‍ट्र समितीसारखे पक्ष केवळ सामाजिक ध्रुवीकरण करतात !

मंदिरांना ऊर्जितावस्‍था हवी !

‘हिंदु हित की बात करेगा, वहीं देश में राज करेगा’च्या ऐवजी ‘जो हिंदु हित का काम करेगा वहीं देश में राज करेगा’, असा नारा देण्‍यात येऊ लागला आहे. त्‍या हिंदुहिताच्‍या कामामध्‍ये मंदिरांच्‍या संदर्भातील कामे पहिल्‍या क्रमांकावर असणे आवश्‍यक झाले आहे. असे झाले तर भारत जगाचा विश्‍वगुरु होण्‍यास वेळ लागणार नाही !

बीबीसीचा मोदींच्‍या आड हिंदुद्वेष !

भारत आणि हिंदू यांविरोधी बीबीसी वृत्तवाहिनीवर केंद्रशासनाने त्‍वरित बंदी घालणे भारतियांना अपेक्षित !

बालविवाहविरोधी मोहीम !

आसाममध्‍ये जनहितार्थ मोहिमांना मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता अशा मोहिमा भारतभर राबवणे आवश्‍यक आहे. ‘मोहीम कोण राबवतो ? आणि ती कशा प्रकारे राबवली जाते ?’, यावर त्‍याचे यशापयश अवलंबून असते. आसाममधील बालविवाहविरोधी मोहिमेतून हेच शिकायला मिळते !

‘मराठी’चा जागर अपेक्षित !

संमेलनात मराठीजन, मराठी भाषा, साहित्‍यिक हे केंद्रस्‍थानी न रहाता दिखाऊ, राजकारणी-पुरोगामी यांच्‍यासमोर नांगी टाकणारी, महागडी साहित्‍य संमेलने, असे त्‍याला स्‍वरूप प्राप्‍त होत आहे. आता सामान्‍य मराठीजनांनीच पुढाकार घेऊन संमेलनाचा मूळ गौरव प्राप्‍त होईपर्यंत पाठपुरावा करावा !

‘आत्‍मनिर्भर’वर भर !

जगातील पाचवी अर्थव्‍यवस्‍था असतांना जनता स्‍वतःच्‍या किमान गरजा भागवण्‍यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्‍प थेट सर्वसामान्‍यांचे दैनंदिन आयुष्‍य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्‍यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्‍हणता येईल !