मास्क आणि सामाजिक अंतर यांचे पालन न केल्याने चिलीच्या राष्ट्रपतींना अडीच लाख रुपयांचा दंड

भारतातील राजकीय नेतेही कोरोनाच्या काळात अशा प्रकारचे सर्रास उल्लंघन उल्लंघन करत असतांना त्यांना दंड ठोठावण्याचे धाडस कुठलेही प्रशासन करत नाही, हे लक्षात घ्या !

नेपाळचे पंतप्रधान ओली यांचे सरकार विसर्जित

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत अचानकपणे संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रीमंडळाची ही शिफारस राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्याकडे पाठवण्यात आली.

हरिद्वार येथील वर्ष २०२१ च्या कुंभमेळ्यात होणार कोरोना नियमांचे पालन !

पुढील वर्षी मार्च ते एप्रिल मासामध्ये कुंभमेळा होणार आहे. कोरोनाच्या काळात होत असलेल्या या कुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व प्रकारचे नियम पाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सामाजिक अंतर राखत येथे गंगा नदीमध्ये भाविकांना स्नान करावे लागणार आहे.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिर परिसरात उत्खननात सापडले १ सहस्र वर्षे प्राचीन मंदिर !

इस्लामी आक्रमणाच्या वेळी मंदिर पाडून त्यावर भराव घातल्याची शक्यता !

कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी (तालुका खेड) येथे अपघात : दुपारी ३ वाजल्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटीहून रत्नागिरीकडे जाणार्‍या रेल्वेच्या देखभाल करणार्‍या गाडीची (मेन्टेनन्स व्हॅनची) मागील चाके रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक अनुमाने ८ घंटे ठप्प झाली होती.

केंद्र आणि राज्य शासन एकत्र आल्यास कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या भूमीचा वाद सोडवता येईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

कांजूरमार्ग येथील मेट्रोच्या जमिनीसाठी केंद्र आणि राज्य शासन वाद करत राहिले, तर हा वाद सोडवणार कोण ? केंद्र आणि राज्य एकत्र येऊन हा वाद सोडवता येईल.

काबूलमध्ये ५ बॉम्बस्फोटांत ९ जण ठार

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका पाठोपाठ ५ साखळी बॉम्बस्फोटांमध्ये ९ जण ठार झाले, तर २० हून अधिक जण घायाळ झाले. शहरातील विविध भागांत हे स्फोट झाले.

निधन वार्ता

सनातनच्या साधिका सौ. हेमा तिगडी यांच्या सासूबाई श्रीमती राधाबाई तिगडी (वय ९१ वर्षे) यांचे १६ डिसेंबर २०२० या दिवशी दुपारी ३.१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर ‘मये भूविमोचन समिती’चे धरणे आंदोलन मागे

मये स्थलांतरित संपत्तीच्या प्रश्‍नी कायद्यात आवश्यक पालट करून सनद देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्यावर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अनेक पदे रिक्त ठेवून राज्य सरकार आकसाने वागत आहे ! – रणजित देसाई, गटनेते, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद

सिंधुदुर्ग – गुणवत्तेत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्गाची अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत.