
पुणे – डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी पुणे शहरात वसंतोत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे हे १४ वे वर्ष असून यंदा हा महोत्सव स्वारगेट येथील गणेश कला क्रीडामंच येथे १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत होणार असल्याचे गायक राहुल देशपांडे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
या महोत्सवात पंडित जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी, गायक पंडित उदय भवाळकर, सतार वादक शाहीर खान, शास्त्रीय गायक विजय कोपरकर, प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया आणि मास्टर शशांक सुब्रह्मण्यम् यांच्यासमवेत अनेक गायक सहभागी होणार आहेत. राहुल देशपांडे यांच्या गायनाने उत्सवाचा समारोप होईल.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा