शेतकर्‍यांचे अधीक्षक अभियंता कार्यालयात ‘ठिय्या आंदोलन’

वीजवितरण आस्थापनाने वीज पंपासाठी पुरवलेला वीजपुरवठा थकित वीज देयकापोटी खंडित केल्याच्या प्रकरणी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी वीज वितरण आस्थापनाच्या कन्हैयानगर भागात असलेल्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ११ फेब्रुवारी या दिवशी ‘ठिय्या आंदोलन’ केले.

बोगस प्रमाणपत्र विकणार्‍या धर्मांधास अटक

विविध शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठ यांची खोटी प्रमाणपत्रे अन् गुणपत्रिका बनवून देणारा सत्तार कासीम अली शेख याला मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. तो ५ ते १५ सहस्र रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे देत असे.

यवतमाळ येथील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल आगीत जळले

धामणगाव मार्गावरील करळगाव घाटातील २ हेक्टर जंगल ९ फेब्रुवारी या दिवशी आगीत जळून गेले. या आगीत लाखो रुपयांचे सागवान आणि मौल्यवान वृक्ष, तसेच वनस्पती नष्ट झाल्या. जंगलात अनेक अनेक दुर्मिळ पशू-पक्षीही होते.

पुण्यामध्ये कोरोनाकाळात २ सहस्र ६४९ टन वैद्यकीय कचर्‍याची निर्मिती ! – महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पुण्यात दिवसेंदिवस कचर्‍याचा प्रश्‍न उग्र रूप धारण करत आहे.

सिंदफळ (जिल्हा धाराशिव) येथील हिंदू बांधवांकडून राममंदिर उभारणीसाठी ४५ सहस्र रुपये निधी अर्पण !

हिंदू बांधवांनी स्वत:च्या नावे निधी न देता गावातील मंदिराच्या नावे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीसाठी निधी सुपूर्द केला.

शिवजयंतीच्या कार्यक्रमावरील बंदी मागे घ्या ! – संभाजी ब्रिगेडची मागणी

राज्य सरकारने कोरोनाचे कारण देऊन शिवजयंती कार्यक्रम रहित करण्याचा निर्णय घेतला आहे ,हI निर्णय मागे घ्यावा, – संभाजी ब्रिगेड

पुणे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांतील काही जागा वापराविना पडून

महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांमध्ये काही लाख चौरस फूट जागा वापराविना पडून आहे.

चीनमध्ये बीबीसीवर बंदी !

चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, ‘बीबीसी वर्ल्ड न्यूज’ने प्रसारणाच्या संदर्भातील निर्देशांचे उल्लंघन केले आहे.

उत्तराखंडमध्ये तुटलेल्या हिमकड्याच्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगाचा प्रवाह थांबून निर्माण झालेला तलाव फुटला, तर पुन्हा प्रलय येण्याची शक्यता !

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या चमोलीतील जोशी मठ येथे हिमकडा कोसळून आलेल्या प्रलयानंतर पुन्हा अशी स्थिती येेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे हिमकडा तुटल्यानंतर जमा झालेल्या ढिगार्‍यामुळे ऋषिगंगा नदीचा वरचा प्रवाह थांबला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलपूर्वक विवाह करणार्‍या आणि लावून देणार्‍या धर्मांधांच्या विरोधात गुन्हा

अशा धर्मांधांवर वचक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !