मला उपाध्यक्ष होऊ न देण्यासाठीच अटकेचा डाव रचला ! – भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांचा आरोप

मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो, तर मला अटक झाली नसती. भाजपचे उपाध्यक्ष होऊ न देण्यासाठीच माझ्या अटकेचा प्रकार घडला असल्याचा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

चीनकडून भुतानच्या गावामध्ये घुसखोरी करून त्यावर अवैध नियंत्रण

भारताला लागून असलेल्या देशांमध्ये अतिक्रमण करून चीन भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसून येते !

खटाव तालुक्यात (जिल्हा सातारा) वाळूची तस्करी केल्याप्रकरणी दोघे कह्यात

वाळूतस्करांना वेळीच आळा घातला असता, तर आज कोरोनासारख्या संकटकाळात अशा गुन्हेगारांनी डोके वर काढले नसते. आता कोरोना संकटाची स्थिती सांभाळून या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे !

नगर येथे रुग्णांची विनापरवाना कोरोना चाचणी आणि उपचार करणार्‍या दोन रुग्णालयांवर कारवाई

संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील ओम साई रुग्णालय आणि समर्थ हॉस्पिटल या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. परवाना नसतांनाही येथे कोरोना चाचणी आणि उपचार करण्यात येत होते.

बनासकांठा (गुजरात) येथे गावातील गोशाळेत कोविड सेंटर !

केंद्र सरकारने देशातील आरोग्यव्यवस्थेची स्थिती पहाता अशा प्रकारचे सेंटर सर्वत्र निर्माण करण्यासाठी गोशाळा चालक आणि आयुर्वेदाचे वैद्य यांना अनुमती दिली पाहिजे, असेच यावरून वाटते !

नगर येथे विनापरवाना चालू असलेल्या ‘सॅनिटायझर’ कारखान्यावर पोलिसांची धाड

असे प्रकार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहेत. राज्यात असे अन्यत्र होत आहे का ? याची तात्काळ आणि कसून पडताळणी होऊन योग्य कारवाई अपेक्षित आहे !

ऑक्सिजन टँकरचा चालक रस्ता चुकल्याने ऑक्सिजनअभावी ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

असे केवळ भारतातच घडू शकते ! रस्ताच ठाऊक नसलेल्या चालकाला ऑक्सिजन आणण्यासाठी कसे काय पाठवले ? यावरून कोरोनाविरोधातील लढ्यात व्यवस्थेतील संबंधित घटक खरोखरच किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते !

कोरोनाबाधित मृतदेहांवरील कपडे चोरून त्यावर ‘ब्रॅण्डेड’ आस्थापनांचे लोगो लावून ते विकणारी टोळी अटकेत !

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या शासनकर्त्यांकडून समाजाला साधनेचे धडे तर दूरचेच; पण साधे नैतिक मूल्यांचेही धडे न दिल्याचे फलित ! मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या  अशा विकृत मानसिकता असलेल्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे !

लसीकरणाचा पहिला डोस घेतलेल्यांना विहीत वेळेत दुसरा डोस द्या ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

ऑक्सिजन पुरवठा आणि रेमडेसिविरचा पुरवठा या दोन गोष्टींचे फार मोठे आव्हान आहे.

वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) भरण्यास करदात्यांना मुदतवाढ

गेल्या आर्थिक वर्षात ५ कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना मार्च आणि एप्रिल मासाचा ३-बी रिटर्न’ भरण्यास ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे.