ऑक्सिजन टँकरचा चालक रस्ता चुकल्याने ऑक्सिजनअभावी ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

असे केवळ भारतातच घडू शकते ! रस्ताच ठाऊक नसलेल्या चालकाला ऑक्सिजन आणण्यासाठी कसे काय पाठवले ? यावरून कोरोनाविरोधातील लढ्यात व्यवस्थेतील संबंधित घटक खरोखरच किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते !

भाग्यनगर – येथे एक ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने ७ कोरोनाबाधितांना ऑक्सिजन मिळण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला. येथील  किंग कोटी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार चालू होते. त्यांतील ७ रुग्णांची प्रकृती गंभीर होती. त्यांना तात्काळ ऑक्सिजनची आवश्यकता होती. ऑक्सिजनचा दाब अल्प  झाल्याने रुग्णांनी प्राण सोडला.

रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमधून अल्प दाबाने पुरवठा होत असल्याची माहिती दिली होती. हे लक्षात घेऊन ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली; मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला आणि ऑक्सिजन अभावी ७ जणांचा मृत्यू झाला. नारयानगुडा पोलिसांनीदेखील रस्ता चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी प्रयत्नही केले; परंतु टँकर येईपर्यंत बराच विलंब झाला होता.