मराठा आरक्षणाविषयी भावना तीव्र असल्या, तरी रस्त्यावर उतरून अशांतता निर्माण करू नका ! – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री

मराठा आरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. यामध्ये कुणीही भडक वक्तव्ये करून समाजामध्ये विद्वेष निर्माण करू नये. याविषयी पोलीस यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे.

मुंबईत युरेनियम सापडल्याचे अन्वेषण राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग !

अणुबॉम्ब किंवा अन्य स्फोटके सिद्ध करण्यासाठी वापरले जाणार्‍या युरेनियमच्या स्फोटकांचा साठा सापडल्याच्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे वर्ग करण्यात आले आहे.

कोरोनाच्या उपचारात देशी औषधांना प्राधान्य द्या ! – मुंबई उच्च न्यायालय

अत्यवस्थ कोरोनारुग्णांसाठी सध्या जीवरक्षक विदेशी औषधांना पर्यायी औषध म्हणून देशी औषधे देण्यात यावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठाने ही सूचना केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांचे ५ खासगी कोविड रुग्णालयांना पैसे परत करण्याचे आदेश !

तसेच रक्कम परत न केल्यास प्रतिदिन १ सहस्र रुपये याप्रमाणे दंडाची रक्कम आकारण्यात येईल’, असेही जिल्हाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

ठाणे येथे पुढार्‍यांच्या हस्तकांकडून टोकन न घेताच केंद्रातील लसींचा साठा घेतला जातो ! – आमदार संजय केळकर, भाजप

एखाद्या केंद्रात १०० लसींचा साठा आला, तर पुढार्‍यांचे हस्तक त्यातील ५० लसी स्वतःसाठी राखून ठेवण्यास केंद्र संचालकांना सांगतात. त्यामुळे टोकन घेऊन रांगेत उभे राहिलेल्या नागरिकांना याचा नाहक मन्स्ताप सोसावा लागतो.

प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये देवीचा जागर करण्यासाठी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक ! – कु. शबरी देशमुख, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !

नागपूर येथे फळ विक्रेत्याने बनावट आधुनिक वैद्य बनून कोविड रुग्णांवर केले उपचार !

पूर्वी फळे आणि आईस्क्रीम यांची विक्री करणारा चंदन चौधरी याने कोरोना संकटाच्या काळात स्वतःला आधुनिक वैद्य असल्याचे खोटे भासवून रुग्णालय चालू केले. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

बंद केलेल्या भ्रमणभाष क्रमांकाचा वापर पैसे चोरण्यासाठीही केला जाऊ शकतो ! – संशोधनाचा निष्कर्ष

नवीन ग्राहक रिसायकल केलेल्या क्रमांकाद्वारे जुन्या ग्राहकाच्या क्रमाकांशी निगडीत माहिती पाहू शकतात. त्यांच्या बँक खात्यातील पैशांची चोरी केली जाऊ शकते.

काबुल (अफगाणिस्तान) येथील शाळेजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ५० जण ठार

सय्यद-उल्-शुहादा हायस्कूलजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ५० जण ठार झाले असून १०० हून अधिक घायाळ झाले आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही. मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक शाळकरी मुला-मुलींचा समावेश आहे.

बार मालकांसाठी पत्र पाठवणार्‍या शरद पवार यांनी शेतकर्‍यांसाठीही एखादे पत्र पाठवावे ! – अतुल भातखळकर, आमदार, भाजप

पत्रात म्हटले आहे, ‘‘उपाहारगृह – परमिट बार मालक यांना अबकारी कराचा भरणा ४ हप्त्यांमध्ये करण्याची सवलत द्यावी. वीज देयकात सवलत मिळावी, तसेच मालमत्ता करात सूट मिळावी.