वाळूतस्करांना वेळीच आळा घातला असता, तर आज कोरोनासारख्या संकटकाळात अशा गुन्हेगारांनी डोके वर काढले नसते. आता कोरोना संकटाची स्थिती सांभाळून या गुन्हेगारांवर जरब बसवण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे !
सातारा – खटाव तालुक्यातील पुसेगाव-जाखणगाव रस्त्यावर खातगुण गावाच्या सीमेमध्ये येरळा नदी वहाते. या नदीतून अवैधपणे वाळू उपसा केल्याप्रकरणी २ जणांना रंगेहात पकडले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून ६ लाख ८८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे. येरळा नदीपात्रातून पुसेगाव ते नेर आणि पुसेगाव ते काटकरवाडी येथे रात्रभर वाळूतस्करांकडून वाळू उपसा चालू असल्याची माहिती पुसेगाव पोलिसांना मिळाली होती.