नगर येथे रुग्णांची विनापरवाना कोरोना चाचणी आणि उपचार करणार्‍या दोन रुग्णालयांवर कारवाई

प्रतीकात्मक छायाचित्र

नगर – संगमनेर तालुक्यातील साकूर गावातील ओम साई रुग्णालय आणि समर्थ हॉस्पिटल या रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. परवाना नसतांनाही येथे कोरोना चाचणी आणि उपचार करण्यात येत होते. तसेच येथे कोरोनावरील औषधांचा साठाही आढळला. या दोन्ही रुग्णालयांना ‘सील’ ठोकण्यात आले असून तेथील वैद्यकीय अधिक्षकांना पुढील चौकशी करून कारवाई करण्यासंदर्भात सांगण्यात आले आहे.