मला उपाध्यक्ष होऊ न देण्यासाठीच अटकेचा डाव रचला ! – भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांचा आरोप

भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे

पुणे – मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतो, तर मला अटक झाली नसती. भाजपचे उपाध्यक्ष होऊ न देण्यासाठीच माझ्या अटकेचा प्रकार घडला असल्याचा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार संजय काकडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांसह सत्ताधार्‍यांवर टीका केली. कुख्यात गुंड गजा मारणे कारागृहातून सुटल्यानंतर त्याने काढलेल्या रॅलीमुळे नोंद असलेल्या एका गुन्ह्यात संजय काकडे यांना अटक झाली होती; मात्र पोलिसांना न्यायालयात काहीही सिद्ध करता आले नाही. त्यामुळे विरोधकांनी मला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा संशय असल्याचे काकडे यांनी सांगितले.