वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.) भरण्यास करदात्यांना मुदतवाढ

केंद्र सरकारने मार्च आणि एप्रिल या मासांसाठी वस्तू आणि सेवा कराचे मासिक विवरणपत्र (जी.एस्.टी.आर्.-३ बी) भरण्यावरील विलंब शुल्क माफ केले आहे; तसेच विलंबाने विवरणपत्र भरणार्‍यांवरील दंडात्मक व्याजदरातही कपात केल्याची केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) अधिसूचना जारी केली आहे.
५ कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांना मासिक विवरणपत्र सादर करण्यासाठी १५ दिवसांची अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर ९ टक्के आणि ३० दिवसानंतर १८ टक्के दंडात्मक व्याज आकारण्यात येईल.

गेल्या आर्थिक वर्षात ५ कोटींपर्यंत आर्थिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना मार्च आणि एप्रिल मासाचा ३-बी रिटर्न’ भरण्यास ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. त्यानंतर पहिले १५ दिवस ९ टक्के आणि त्यानंतर १८ टक्के व्याज आकारण्यात येईल, अशी माहिती अधिसूचनेत दिली आहे.