भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आष्टा नगरपालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन 

नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची, ४ वर्षांत ३३ टन जंतूनाशक पावडर आणि अन्यत्र झालेल्या अशा २० लाख रुपये व्ययाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी नगरपालिकेच्या समोर शिवसेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले.

अंमलबजावणी संचालनालयाची हितेंद्र ठाकूर यांच्या विवा समुहाच्या ६ ठिकाणांवर धाडी

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यातील पैशांच्या देवाण-घेवाण (मनी लॉन्ड्रिंग) प्रकरणात अन्वेषण करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने २२ जानेवारी या दिवशी मीरा-भाईंदर, वसई-विरार परीसरांत धाडी घातल्या.

सीरमला लागलेल्या आगीच्या चौकशीनंतरच अपघात कि घातपात हे स्पष्ट होईल ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे.

सरकारी आस्थापनांचे खासगीकरण होत असतांना मंदिरांचे सरकारीकरण का ? – सद्गुरु जग्गी वासुदेव

हिंदूबहुल भारतात हिंदूंच्या संतांना मंदिरांवरील सरकारी नियंत्रण हटवण्यासाठी हस्तक्षेप करावा लागतो, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! शेतकरी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरू शकतात, तर देशातील कोट्यवधी हिंदू मंदिरांसाठी असे का करू शकत नाहीत ?

व्यापक विरोधानंतर कर्नाटकातील भाजप सरकारकडून ‘राममंदिर का नको ?’, या पुस्तकांची खरेदी रहित !

‘मनुष्याला मंदिर कशाला हवे ?’ अशा आशयाचे लिखाण असलेले पुस्तक सरकारनेच खरेदी करून त्याची प्रत प्रत्येक ग्रंथालयांत ठेवण्याच्या प्रक्रियेने शेवटचा टप्पा गाठला होता. यामुळे भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

केरळमध्ये मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा आवाज ५५ डेसीबलपेक्षा अधिक न ठेवण्याचा सरकारचा आदेश

मंदिरांच्या ध्वनीक्षेपकावरून असा आदेश देणारे केरळमधील कम्युनिस्ट सरकार मशिदींवरील ध्वनीक्षेपकांच्या संदर्भात असा आदेश देण्याचे धाडस का दाखवत नाही ?

श्रीलंकेतील संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ संघटना प्रयत्नशील !

श्रीलंकेत हिंदूंच्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या धर्मांतराला आळा बसावा, यासाठी संसदेत धर्मांतरविरोधी विधेयक आणण्यासाठी ‘शिव सेनाई’ या संघटनेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे – श्री. मरावांपुलावू सच्चिदानंदन

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या माजी महिला न्यायमूर्तींनी राज्यपालपद मिळण्यासाठी ८ कोटी ८० लाख रुपयांची लाच दिली !

निवृत्त न्यायाधिश राज्यपालपद मिळण्यासाठी लाच दिल्याचे स्वतःच सांगत असतील तर ‘त्यांच्या कार्यकाळात कशा प्रकारे न्यायनिवाडा दिला असेल ?

(म्हणे) ‘आम्ही आमच्या भूभागावरच बांधकाम केले आहे !’

चीनने अरुणाचल प्रदेशमधील भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करून एक गाव वसवल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. त्यावर चुनयिंग यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

बंगालमध्ये भाजपच्याच २ गटांत हाणामारी !

अशा प्रकारे हाणामारी केल्याने जनता कधीतरी मत देईल का ? तृणमूल काँग्रेसमधून आलेले कार्यकर्ते त्यांच्या मूळ हिंसाचारी वृत्तीचा त्याग करणार आहेत का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !