भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी आष्टा नगरपालिकेसमोर शिवसेनेचे आंदोलन 

आंदोलन करताना शिवसेनेचे कार्यकर्ते

आष्टा (जिल्हा सांगली) – येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभाराची, ४ वर्षांत ३३ टन जंतूनाशक पावडर आणि अन्यत्र झालेल्या अशा २० लाख रुपये व्ययाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागण्यांसाठी नगरपालिकेच्या समोर शिवसेनेच्या वतीने १९ जानेवारी या दिवशी बुरखा फाडो आंदोलन करण्यात आले. या वेळी नगरपालिकेचे विरोधी गटनेते वीर कुदळे, शिवसेना शहरप्रमुख राकेश आटुगडे, नंदकिशोर आटुगडे उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे मुख्याधिकारी यांनी सांगितले.