केरळमध्ये मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाचा आवाज ५५ डेसीबलपेक्षा अधिक न ठेवण्याचा सरकारचा आदेश

मंदिरांच्या ध्वनीक्षेपकावरून असा आदेश देणारे केरळमधील कम्युनिस्ट सरकार मशिदींवरील ध्वनीक्षेपकांच्या संदर्भात असा आदेश देण्याचे धाडस का दाखवत नाही ?

थिरुवनंतपूरम् (केरळ) – राज्यातील कम्युनिस्ट सरकारने मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाच्या आवाजावर नियंत्रण आणण्याचा आदेश दिला आहे.

सरकारने ‘केरळ देवस्वम् बोर्डा’ला दिलेल्या आदेशामध्ये ‘मंदिरांवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज ५५ डेवीबलपेक्षा अधिक ठेवू नये’, असे म्हटले आहे. यास सामाजिक माध्यमांतून विरोध केला जात आहे.