महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र न्यायालये आणि अन्वेषण पथक यांची नेमणूक करणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, तसेच दोषींना लवकर शिक्षा व्हावी, या हेतूने राज्यात ‘शक्ती कायदा’ अमलात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या संशोधनाविषयीच्या लेखांना प्रसिद्धी

दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने वर्ष २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ४ लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे.

आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्‍चित आहे ! – पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोग

आता खुल्या शेतीला भविष्य राहिलेले नाही. आच्छादित शेतीशिवाय काहीही शिल्लक रहाण्याची शक्यता नाही. आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्‍चित आहे. पृथ्वीवरचे तापमान आणि हवेतील कार्बन वाढल्याने कितीतरी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयात कायमस्वरूपी नियुक्तीची शिफारस ‘कॉलेजियम’ने मागे घेतली

बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यातंर्गत प्रविष्ट करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये दिलेल्या ३ निर्णयांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

रायगड किल्ल्यावर लग्नापूर्वीचे चित्रीकरण; शिवप्रेमींमध्ये संताप

रायगड किल्ल्यावर लग्नापूर्वीचे जोडप्यांचे चित्रीकरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. होळीचा माळ, किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्यांना घेऊन चित्रीकरण करण्यात आल्याची ध्वनीचित्रफीत समोर आली आहे.

मुंबईसह पुण्यात सतर्कतेची चेतावणी

मुंबई आणि पुणे शहरातील सर्व प्रमुख ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

माघ वारी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वारकर्‍यांनी घेतली भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव न्यून झाल्याने अनेक सार्वजनिक उपक्रम चालू झाले आहेत. मंदिरेही दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत, तसेच लसीकरणाची मोहीमही चालू करण्यात आली आहे. नियम आणि अटी पाळून वारकर्‍यांना वारीसाठी संमती मिळावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली.

वाहनात इंधन नसल्याने जिल्हा रुग्णालयात पाठवायचे ‘स्वॅब’ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पडून असल्याचे उघड !

माहिती मिळताच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धडक देत परिस्थितीची माहिती घेतली. या वेळी त्यांनी स्वखर्चातून इंधनासह खासगी वाहनही उपलब्ध करून दिले.

पाकमधील १२६ वर्षे जुने असलेले शिवमंदिर डागडुजीनंतर भाविकांसाठी खुले !

पाकला खरोखरंच तेथील हिंदूंविषयी काही तरी वाटत असेल, तर त्याने प्रथम तेथील हिंदु युवतींचे बळजोरीने होणारे धर्मांतर आणि हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवायला हवेत !

गोवा विधानसभेत विकासप्रकल्प रहित करण्याचा ठराव २० विरुद्ध ११ मतांनी फेटाळण्यात आला

मोले ते वास्को राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, कुळे ते वास्को रेल्वेच्या लोहमार्गाचे दुपदरीकरण आणि तम्नार ते गोवा उच्चदाबाची वीजवाहिनी या तिन्ही प्रकल्पांना विधानसभेत सत्ताधारी पक्षातील आमदार एलिना साल्ढाणा यांच्यासह विरोधी सदस्यांनी जोरदार विरोध करूनही सरकार या तिन्ही प्रकल्पांवर ठाम राहिले.