मुंबई – पोलिसांच्या चकमकीत ठार झालेला बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचार करणारा बलात्कारी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्यशासनाने मुंबई उच्च न्यायालयात दिली. अक्षय शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी अक्षय याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी न्यायालयात याचिका केली होती. अंत्यसंस्काराच्या वेळी सुरक्षा प्रदान करण्याची ग्वाहीही सरकारने न्यायालयात दिली. अंबरनाथ येथील एका दफनभूमीत अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
नूतन लेख
- मागील ६ वर्षांत महाराष्ट्रातील ९६ सशस्त्र माओवाद्यांचा खात्मा
- अभिजात भाषेचा दर्जाच्या कार्यवाहीविषयी मराठी भाषा विभाग मार्गदर्शन घेणार !
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : माहीम येथे रहिवासी इमारतीला आग !; चोराने टेंपोतून अडीच लाख रुपये पळवले !
- श्री महालक्ष्मीदेवीची सरस्वतीदेवीच्या रूपात केलेली अलंकार पूजा !
- श्री तुळजाभवानीदेवीची ललिता पंचमीनिमित्त रथ अलंकार महापूजा !
- पारदर्शी आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडा ! – चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी