शिक्षणाने समाजात इतिहासाविषयी अस्मिता न निर्माण केल्याचा परिणाम !
मुंबई – रायगड किल्ल्यावर लग्नापूर्वीचे जोडप्यांचे चित्रीकरण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. होळीचा माळ, किल्ल्यावरील बाजारपेठ परिसरात जोडप्यांना घेऊन चित्रीकरण करण्यात आल्याची ध्वनीचित्रफीत समोर आली आहे. रायगड किल्ल्याचा परिसर हा पुरातत्व विभागाकडे आहे. असे असतांनाही तेथे व्यावसायिक चित्रीकरणाला अनुमती कुणी आणि कशी दिली, असा संतप्त प्रश्न शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे. हा प्रकार पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे झाला असल्यास संबंधित कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.