Bhagwan Jagannath Temple : पुरी (ओडिशा) येथील भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखराभोवती गरुड पक्षी ध्वज घेऊन उडतांना दिसला !

देशात शुभ घटना घडण्याची शक्यता असल्याचे काही भाविकांचे मत

गरुड पक्षी भगवान जगन्नाथ मंदिराच्या शिखराभोवती ध्वज  घेऊन प्रदक्षिणा घालत असल्याप्रमाणे दिसत आहे

पुरी (ओडिशा) : येथील भगवान जगन्नाथ मंदिराचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यात एक गरुड पक्षी मंदिराच्या कळसावरील ध्वजाचा काही भाग घेऊन उडतांना दिसत आहे. ध्वजाचा काही भाग त्याच्या पंजात अडकलेला दिसत आहे. या घटनेमुळे देशात शुभ घटना घडणार असल्याचे काही भाविकांचे मत आहे, तर काहींनी देशात अशुभ घटना घडण्याची भीती व्यक्त केली आहे. वर्ष २०२० मध्ये वीज पडल्याने मंदिराच्या ध्वजाला आग लागली होती आणि त्यानंतर देशाला कोरोना महामारीचा सामना करावा लागला होता, याची आठवण लोक सांगत आहेत.

८०० वर्षे जुने जगन्नाथ मंदिरच्या कळसावरील ध्वज नेहमी वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. मंदिरात प्रतिदिन ध्वज पालटला जातो. ही परंपरा शतकानुशतके अखंडपणे चालू आहे. ‘ही परंपरा थांबली, तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद राहील’, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत मंदिराचे दरवाजे उघडले, तर आपत्ती येऊ शकते, अशीही मान्यता आहे.

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरावरील ध्वज गरुडाने घेऊन जाणे आणि त्याच वेळी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना हैद्राबादमधील श्री जगन्नाथ मंदिरावरील नीलचक्र प्रकाशमान दिसणे, या दोन्ही घटनांमागे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दैवी संकेत असणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘१२.४.२०२५ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह आम्ही साधक हैद्राबादमध्ये प्रवास करत होतो. त्या वेळी तेथे पुरी (ओडिशा) येथील श्री जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती असलेले मंदिर दिसले.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

मंदिराकडे पहाताक्षणी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची दृष्टी त्या मंदिरावर असलेल्या नीलचक्रावर पडली. त्या वेळी ते नीलचक्र अतिशय प्रकाशमान दिसले. त्यानंतर आम्हाला समजले की, पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिरावरील ध्वज घेऊन गरुड उडत असल्याची घटना त्याच कालावधीत घडली आहे. या मंदिरावरील नीलचक्राच्या जवळच हा ध्वज लावलेला असून तो फडकत असतो. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना हैद्राबादमधील मंदिरावरील नीलचक्र प्रकाशमान दिसणे आणि त्याच वेळी पुरी येथील मंदिरावरील ध्वज गरुडाने घेऊन जाणे, या दोन्ही घटनांमागे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दैवी संकेत असल्याचे लक्षात आले.’

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई