जाजपूर (ओडिशा) येथील शाळेत उठाबशा काढण्याची शिक्षा केल्यामुळे इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

जाजपूर येथील सूर्य नारायण नोडल उच्च प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गातील एका मुलाला शिक्षा म्हणून उठाबशा काढण्यास सांगण्यात आले होते. उठाबशा काढतांना हा मुलगा बेशुद्ध पडला.

ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात १ जानेवारी २०२४ पासून वस्त्रसंहित लागू होणार !

देशातील एकेका मंदिरात अशा प्रकारचे पालट आता करावे लागत आहेत. हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावर देशातील सर्वच मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर नियम असतील !

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची देशभरात ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी ! – जगन्नाथ सराका, कायदामंत्री, ओडिशा

पुरी येथील भगवान जगन्नाथ मंदिराची ओडिशा आणि अन्य ६ राज्ये येथे ६० सहस्र ८२२ एकरहून अधिक भूमी आहे, अशी माहिती ओडिशाचे कायदामंत्री जगन्नाथ सराका यांनी विधानसभेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली.

ओडिशामध्ये पाऊस आणि वीज पडून १२ जणांचा मृत्यू

हवामान खात्याने पुढील ४ दिवस राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाची चेतावणी दिली आहे. वीज कोसळल्याने ८ गुरांचाही मृत्यू झाला आहे.

ओडिशामध्ये माओवाद्यांच्या तळावरून मोठा शस्त्रसाठा जप्त !

राज्यातील मलकानगिरी वनक्षेत्रात सीमा सुरक्षादलाच्या सैनिकांनी माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई केली. कैमेला भागातील माओवाद्यांच्या तळाविषयी सीमा सुरक्षा दलाला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती.

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने प्रशासनाकडे मागितला अहवाल !

ओडिशा येथे ११ अल्पवयीन हिंदु मुलांच्या धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

ओडिशा रेल्वे अपघाताच्या प्रकरणी रेल्वेचा कनिष्ठ अभियंता आमीर खान पसार

अपघातानंतर सीबीआयने आमीर खान याची चौकशी केली होती. तेव्हापासून तो कुटुंबासह बेपत्ता आहे. या अपघातामध्ये ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम’मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता वर्तवली जात होती.

पुरी (ओडिशा) येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ !

भगवान जगन्नाथ रथयात्रा मंदिरापासून अनुमाने ३ किमी अंतरावरील गुंडीचा मंदिरापर्यंत जाते, जे भगवान जगन्नाथाच्या मावशीचे घर असल्याचे मानले जाते. या रथयात्रेत अनुमाने २५ लाख लोक सहभागी होण्याची शक्यता आहे.

ओडिशा अपघातस्थळावरील रेल्वे वाहतूक ५१ घंट्यांनी पूर्ववत् !

अपघातानंतर ५१ घंट्यांनी जेव्हा पहिली रेल्वे रुळावरून मार्गस्थ झाली, तेव्हा रेल्वेमंत्री हात जोडून उभे होते. ते म्हणाले की, आमचे दायित्व अजून संपलेले नाही. ‘हरवलेल्या लोकांना शोधणे, हे आमचे ध्येय आहे’, असे म्हणत ते भावूक झाले.