ओडिशा येथे लव्ह जिहाद

जगतसिंगपूर (ओडिशा) – येथे महंमद समीर मन्सुरी याने येथील एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच त्याने तिच्यावर विवाह आणि धर्मांतर यासाठी दबाव आणला. या प्रकरणी पोलिसांनी मन्सुरी याला अटक केली. मन्सुरी मुळचा बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील रहाणारा आहे. सध्या तो काश्मीरमध्ये रहतो आणि तेथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो.
मन्सुरी वर्ष २०२२ मध्ये एका ‘ऑनलाईन गेमिंग अॅप’द्वारे जगतसिंगपूर जिल्ह्यातील पीडितेच्या संपर्कात आला. दोघांची जवळची मैत्री झाली आणि लवकरच त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पीडितेची भेट घेण्यासाठी आरोपी ओडिशामध्येही आला. दोघांची भेट एका हॉटेलमध्ये झाली. त्याने पीडितेला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले; मात्र या भेटीनंतरच पीडितेला त्याचे खरे रूप कळले आणि तिने त्याच्यापासून दूर रहाणे चालू केले. त्यानंतर आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करणे चालू केले. त्याने तिला तिचा धर्म पालटण्यास आणि त्याच्याशी निकाह करण्यास भाग पाडले.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, जेव्हा मी धर्मांतर करण्यास नकार दिला, तेव्हा त्याने आमचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित केले. मला अपकीर्त करण्यासाठी ते व्हिडिओ माझे कुटुंब, नातेवाईक आणि मित्र यांच्याकडेही पाठवले. माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केले गेले. त्याने पैशांची मागणीही केली.
संपादकीय भूमिकाअसे प्रकार रोखण्यासाठी लव्ह जिहाद्यांना फाशीची शिक्षा देण्याचे प्रवधान असले पाहिजे. यासह हिंदूंना धर्मशिक्षण दिले पाहिजे ! |
मुसलमान युवती आणि तिचा सहकारी यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
रंगपूर (बांगलादेश) येथील एका हिंदु दुकानदारावर जीवघेणे आक्रमण !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
Bihar Conversion : बिहारमध्ये मिशनरींकडून हिंदूंना आमीष दाखवून ख्रिस्ती बनवण्याचा प्रयत्न !
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !