चिपी विमानतळाच्या नामकरणावरून वाद !

येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे.

अवैध मद्याची वाहतूक करणारे राज्य उत्पादन शुल्क पथकाच्या वाहनाला धडक देऊन पसार

अवैध मद्याची वाहतूक करणार्‍यांची मजल कुठपर्यंत गेली, हे राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाने गांभीर्याने घेणे आवश्यक आहे अन्यथा वाळू तस्करी करणारे जसे महसूल अधिकार्‍यांवर प्राणघातक आक्रमणे करतात, तशी वेळ त्यांच्यावर आल्यास आश्‍चर्य ते काय ?

अफजलखान वधाच्या दिवशी ट्विटरवरील #ShivPratapDin हॅशटॅग ट्रेंड चौथ्या स्थानी !

या ट्रेंडमध्ये धर्मप्रेमींनी ‘वर्तमानस्थितीत आतंकवाद नष्ट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा ही युद्धनीती अवलंबण्याची आवश्यकता आहे’, असे सांगितले.

आयुर्वेद संशोधन प्रकल्प आडाळी एम्.आय.डी.सी. येथेच होणार ! – खासदार विनायक राऊत, शिवसेना

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम्.आय.डी.सी. येथे आयुर्वेद संशोधन प्रकल्प संमत करण्यात आला; मात्र तो लातूर येथे हालवण्याच्या हालचाली चालू होत्या. या पार्श्‍वभूमीवर आयुर्वेद संशोधन प्रकल्प आता दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथेच होणार आहे.

नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांचे साहाय्य

तालुक्यातील कोंडये येथील सौ. मयुरी मंगेश तेली या ऑक्टोबर २०२० मध्ये अतीवृष्टीमुळे आलेल्या पुरात वाहून गेल्या होत्या. सौ. मयुरी या नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झाल्यामुळे महसूल विभागाने त्यांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.

नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

नवीन प्रकारच्या कोरोनामुळे उपचाराची पद्धत याविषयी ‘टास्क फोर्स’ने अभ्यास करावा. नवीन प्रकारचा विषाणू ज्या वेगाने पसरतो, त्या प्रमाणात उपचार आणि चाचण्या यांची क्षमता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरातील जीर्ण झालेल्या ९ मूर्ती पालटणार

श्री विठ्ठल मंदिर आणि परिवार देवता यांमधील २८ मूर्तींतील ९ मूर्ती जीर्ण झाल्या असून त्या भंग पावल्या आहेत.

महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात सनातनच्या साधकांची पोलिसांकडून चौकशी

धर्मप्रसार करणार्‍या संस्थेच्या साधकांची चौकशी करणार्‍या पोलिसांनी जर धर्मांधांची अशा प्रकारे कसून चौकशी केली असती, तर देश एव्हाना आतंकवादमुक्त झाला असता !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘सनातन पंचांग २०२१’ भेट देण्यात आले.