पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री विठ्ठल मंदिरातील जीर्ण झालेल्या ९ मूर्ती पालटणार

२४ डिसेंबर या दिवशी नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार ! – विठ्ठल जोशी, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी  

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील आणि परिवार देवतांमधील जीर्ण झालेल्या ९ मूर्ती पालटण्यात येणार आहेत. यासाठी मंदिरात मागील २ दिवसांपासून होमहवन करण्यात आले. ‘२४ डिसेंबर या दिवशी नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल’, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

सौजन्य abp माझा

श्री विठ्ठल मंदिर आणि परिवार देवता यांमधील २८ मूर्तींतील ९ मूर्ती जीर्ण झाल्या असून त्या भंग पावल्या आहेत. त्यामुळे या मूर्ती पालटण्याविषयी मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. या मूर्तींमध्ये श्री विठ्ठल मंदिरातील बोधले महाराज समाधीजवळील श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीसह ३ गणेशमूर्ती, १ खंडोबा, १ काळभैरव, गरुड आणि हनुमंत या देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. पंढरपूर येथील मूर्तीकार परदेशी यांनी नवीन मूर्ती बनवल्या आहेत.