‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्याविषयी पुणे आणि हिंगणघाट येथे निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली.

‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रोत्साहन देणार्‍या औषधी आस्थापनाच्या वैद्यकीय प्रतिनिधीचे सनातनचे साधक वैद्य संजय गांधी यांच्याकडून प्रबोधन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘अ‍ॅरिस्टो’ औषधी आस्थापनाकडून ‘Vital Vitamin for every Valentine’ म्हणजे ‘प्रत्येक प्रेमविरासाठी हे औषध आवश्यकच आहे’, असे विज्ञापन करण्यात आले होते.

देव, देश अन् धर्मासाठी तरुण पिढीमध्ये जागृती करणे आवश्यक ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

आज निरनिराळे ‘डे’ भारतात साजरे केले जातात. त्यांना कुठलाही शास्त्राधार नाही. पाश्‍चात्त्यांच्या या ‘डे’ संस्कृतीसमवेत विकृतीही आली आणि त्याला आपली युवा पिढी आज बळी पडत चालली आहे.

यवतमाळ येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची हानी ! 

वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकी फेरी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई वाहन चालक-मालक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी या दिवशी वाशी येथे रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकीफेरी आयोजित केली होती.

रामभक्त रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या !

रिंकू शर्मा यांच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय चाकरी देण्यात यावी, या मागण्यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मिरज येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील अधिकारी निडोनी यांनी स्वीकारले.

कोरोनामुळे यंदा पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्याची अनुमती रहित !

१९ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांना पन्हाळगडावरून शिवज्योत नेण्यास अनुमती रहित करण्यात आल्याचे नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी सांगितले.

शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना करणार ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार

शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी दुर्ग महासंघाची स्थापना  करण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र आणि राज्य पुरातत्त्व खात्याशी दुर्ग संस्थांचे सामंजस्य करार करून गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला हातभार लावला जाणार आहे, अशी माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.

(म्हणे) ‘जनता प्रत्युत्तर देणार !’- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी

देहलीतील आंदोलन देशातील ८० कोटी शेतकर्‍यांचे आहे. मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मूठभर शेतकर्‍यांचे आणि दलालांचे असल्याचे सांगत आहे