नवी मुंबई – उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि नवी मुंबई वाहन चालक-मालक सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ फेब्रुवारी या दिवशी वाशी येथे रस्ता सुरक्षेसाठी महिलांची विशेष दुचाकीफेरी आयोजित केली होती. ३२ वे रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
(सौजन्य : TV9 Marathi)
या फेरीमध्ये १२० महिला दुचाकीस्वार आणि १०० हून अधिक महिला अबोली ऑटो रिक्षासह सहभागी झाल्या होत्या. या फेरीच्या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिनी पाटील यांनी महिला वाहतूक नियमांविषयी मार्गदर्शन केले.
मोटार वाहन निरीक्षक रश्मी पगार, राहुल गावडे, शीतल पाटील यांनीही उपस्थितांना संबोधित केले. सामाजिक कार्यकर्ते राजेश भोईर, किरण माणगावकर, एम्.डी. पाटील, भगत या वेळी उपस्थित होते. या फेरीसाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश कचरे यांनी विशेष श्रम घेतले.