रामभक्त रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे निवेदन

मिरज उपविभागीय कार्यालयातील अधिकारी १ निडोनी यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मिरज, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – देहलीत रामजन्मभूमीसाठी निधीसंकलन करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते रामभक्त रिंकू शर्मा यांची १० फेब्रुवारी या दिवशी धर्मांध जिहाद्यांनी हत्या केली. या वेळी सिलेंडर स्फोट करून संपूर्ण कुटुंबियांची हत्या करण्याचा जिहाद्यांचा डाव होता. तरी रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्यांना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी. रिंकू शर्मा यांच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय चाकरी देण्यात यावी, या मागण्यांसाठी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने मिरज येथील उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील अधिकारी निडोनी यांनी स्वीकारले.

उपविभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धर्मांधाच्या दबावामुळे पोलीस अटक केलेल्या धर्मांधांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, तसेच या घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही मासात ध्रुव त्यागी, अंकित शर्मा यांसह अनेक हिंदूंची षड्यंत्र करून हत्या केली जात आहे. विशेष करून देहलीतील वाढत्या घटनांसाठी देहली पोलिसांवर उत्तरदायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. याचसमवेत देशभरात ज्या ज्या ठिकाणी हिंदू अल्पसंख्य आहेत त्या ठिकाणी हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांनी शस्त्रपरवाने अधिक संख्येने देण्यात यावेत.

या वेळी बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ युवाआघाडी अध्यक्ष आणि शिवसेनेचे श्री. श्रेयस माधव गाडगीळ, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष देसाई, सर्वश्री कौस्तुभ गुरव, लक्ष्मण हुलवान, बाहुबली छत्रे, अमोल कोरे, संतोष वाघमोडे उपस्थित होते.