पुणे येथील अधिकोषाची २ कोटी ६९ लाखांची फसवणूक करणार्‍या माजी नगरसेवकासह १० जणांवर गुन्हा नोंद !

‘श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेड’च्या विशालनगर, पिंपळे निलख येथील शाखेत बनावट कागदपत्रे सिद्ध करून अधिकोषाची २ कोटी ६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत घडली आहे.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांना ‘मास्क’ न वापरल्याने दंड

‘मास्क नाही, प्रेवेश नाही’ या राज्यशासनाच्या धोरणाचे उल्लंघन होत असल्याचे पालघरमध्ये समोर आले असून ‘मास्क’ बांधला नाही म्हणून पालघरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भारती कामडी यांना २०० रुपयांचा दंड भरावा लागला आहे.

मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याची कुटुंबियांनी दिली चेतावणी

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अद्याप अटक का होत नाही, अन्य गुन्ह्यांतील आरोपी सापडतात, नाहीच सापडले तर पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांना पकडतातच. असे असतांना बोठेच्या संदर्भात असे का होत नाही ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या प्रतिकात्मक मूर्ती सभामंडपात आणण्यात आल्या. त्यानंतर मंत्रोच्चार आणि मंगलाष्टक यांच्या गजरात उपस्थितांनी अक्षता वाहिल्या.

रिंकू शर्मा यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दलाचे मोर्चाद्वारे निवेदन

रिंकू शर्मा यांच्या हत्येत गुंतलेल्या आक्रमणकर्त्यांवर रासुका लावून त्यांना फाशी देण्यात यावी.

नागपूर येथे ‘ऑनलाईन गेम’च्या आहारी जाऊन ३ अल्पवयीन मुलांनी घर सोडले  !

लहान मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांना लहानपणापासून धर्मशिक्षण देऊन धर्माचरणी बनवल्यास अशा घटना कधीही घडणार नाहीत. यासाठी पालकांनी स्वतः धर्मशिक्षण घेऊन मुलांनाही ते दिले पाहिजे. यातून चांगले संस्कार आणि धर्मशिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे अधोरेखित होते !

राममंदिर वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसुलीचा काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांचा आरोप 

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राममंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांनी केला.

भाजप प्रदेशाध्यक्षांना स्वत:च्या जिल्ह्यात मतदारसंघही न मिळणे दुर्दैैवी ! – जयंत पाटील, पालकमंत्री, सांगली

चंद्रकांतदादा पाटील यांना स्वतःचा कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यातील मतदारसंघात निवडणूक लढवावी लागली.

श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने व्यंकटेश ग्रूपच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले

महाराष्ट्रात सध्या रक्ताचा तुटवडा चालू असून रुग्णांच्या शस्त्रकर्मासाठीही रक्त उपलब्ध नाही.