‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्याविषयी पुणे आणि हिंगणघाट येथे निवेदन

हडपसर येथील साधना कन्या विद्यालयामध्ये उपमुख्याध्यापक श्री. पिसे (मध्यभागी) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

पुणे, १५ फेब्रुवारी (वार्ता. ) – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पाश्‍चात्त्य विकृतीला आळा बसावा आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन तसेच शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. १४ फेब्रुवारी हा ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करावा.  महाविद्यालयाच्या परिसरात अपप्रकार करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करावी ’, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.

हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. श्री. पंडित शेळके यांना निवेदन देतांना धर्मप्रेमी
हिंगणघाट येथे पोलीस निरीक्षक चव्हाण यांना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस श्रीमती शुभांगी गोंजारे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त, शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षण कार्यालय, पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, परिमंडळ १ आणि २ चे पोलीस उपायुक्त, थेऊर येथील श्री चिंतामणी महाविद्यालय, मांजरी येथील श्रीकृष्ण घुले  महाविद्यालय, हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, साधना कन्या विद्यालय, एस्.एम्. जोशी महाविद्यालय आणि साधना विद्यालय येथे देण्यात आले.