Madhya Pradesh Wall Collapsed : सागर (मध्यप्रदेश) : शिवलिंग उभारतांना शेजारील घराची भिंत कोसळल्याने ९ मुलांचा मृत्यू !

हडौल मंदिर परिसरात भागवत कथेची सिद्धता केली जात होती. येथे शिवलिंग उभारले जात होते. अशातच मंदिराशेजारील जीर्ण झालेल्या इमारतीची भिंत कोसळली.

भोपाळमध्ये ४ ऑगस्टला ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ कार्यक्रमाचे आयोजन !

संघटनेचे प्रदेश राज्य समन्वयक कृष्णा सोलंकी यांनी सांगितले की, या कार्यक्रमात मध्यप्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांतील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Guna Convent : गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेच्या संमेलनात विद्यार्थ्यांना संस्कृत श्‍लोक म्हणण्यास विरोध !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून शाळेच्या विरोधात आंदोलन !

Bageshwar Dham Name Plate : ‘बागेश्‍वर धाम येथील सर्व दुकानदारांनी १० दिवसांच्या आत नावाच्या पाट्या लावाव्यात ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

येथील सर्व दुकाने आणि हॉटेल्स यांच्या प्रवेशद्वारांवर मालकाचे नाव लिहिणे आवश्यक असून ती चांगली गोष्ट आहे, असे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा भावपूर्ण वातावरणात साजरी !

या वेळी ‘ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, उपाध्यक्ष श्री. भवरास्कर, तसेच डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांच्यासह देशातील विविध भागांतून आलेले भक्त आणि भाविक उपस्थित होते.

महाबोधी मंदिर आणि महाकालेश्‍वर मंदिर येथेही दुकानदारांना त्यांच्या नावाच्या पाट्या लावाव्या लागणार !

उत्तरप्रदेशनंतर आता बिहारमधील गया, तसेच उज्जैन (मध्यप्रदेश) येथील ज्योतिर्लिंग महाकालेश्‍वर मंदिर येथील परिसरातील दुकानांच्या मालकांना त्यांची नावे दुकानाच्या फलकावर लिहावी लागणार आहेत. संपूर्ण मध्यप्रदेशमध्ये असा आदेश देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे.

विदिशा (मध्‍यप्रदेश) येथील शाळेत स्‍वयंसेवी संस्‍थेच्‍या नावाखाली येशू ख्रिस्‍ताचे गुणगाण गाणारी पुस्‍तके विनामूल्‍य वितरित करण्‍याचा प्रयत्न !

मध्‍यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना ख्रिस्‍ती मिशनरी अशा प्रकारचे धाडस करतातच कसे ? अशा प्रकारे हिंदूंची धार्मिक पुस्‍तके मिशनरी शाळांमध्‍ये वाटप करण्‍याचा हिंदु संघटनांनी प्रयत्न केला असता, तर एव्‍हाना देशात ढोंगी निधर्मीवाद्यांनी आकांडतांडव केला असता !

इंदूर (मध्यप्रदेश) येथे प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला गुरुपादुकांच्या पालखीद्वारे प्रारंभ

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे गुरु, तसेच सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या गुरुपौर्णिमा महोत्सवाला २० जुलैपासून प्रारंभ झाला.

मध्यप्रदेशात १४ मुसलमानांनी स्वीकारला हिंदु धर्म !

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात असलेल्या खजराना मंदिरात १४ मुसलमान स्वेच्छेने हिंदु धर्मात परतले आहेत. मंदिरात विधीपूर्वक संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

Guru Poornima In M.P. Schools : गुरुपौर्णिमेला मध्यप्रदेशमधील सर्व शाळांमध्ये २ दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

गुरु कोणत्या धर्माचे नसतात, तर ते शिष्य, विद्यार्थी याच्याशी संबंधित असतात. हेही न कळणारी काँग्रेस हिंदुद्वेषीच होय !