मध्यप्रदेशमध्ये महंमद हुसेन याने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीवर केला बलात्कार !

जबलपूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तेथील एक हिंदु तरुणी विवाह जुळवणार्‍या संकेतस्थळाच्या माध्यमातून महंमद हुसेन नावाच्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली. या मुसलमान तरुणाने तो हिंदु असून त्याचे नाव राहुल असल्याचे तिला सांगितले. हुसेनने त्या तरुणीला एके दिवशी हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. तेथे हुसेन याने तिच्यावर बलात्कार केला. यानंतरही हुसेन आणि पीडित तरुणी यांच्यात सतत चर्चा होत होती; परंतु हुसेनने लग्न करण्यास नकार दिला.

एके दिवशी ते दोघे हॉटेलमध्ये एकमेकांना भेटायला पोचले; परंतु तेथे पीडित तरुणीला महंमद हुसेन याच्या वास्तवाची माहिती मिळाली. त्या तरुणाने त्याचे नाव राहुल नव्हे, तर महंमद हुसेन असे सांगितले. हे ऐकून त्या तरुणीला वास्तव कळले. तिने त्या तरुणाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.